वांद्रे-वरळी सी लिंकवरही मनसेची `टोळधाड` 25 MNS workers detained for vandalising Bandra-Worli sea li

वांद्रे-वरळी सी लिंकवरही मनसेची `टोळधाड`

वांद्रे-वरळी सी लिंकवरही मनसेची `टोळधाड`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर राडा करत टोलनाक्याची मोडतोड केली. तोडफोड प्रकरणी वांद्रे पोलिसांनी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीनंतर सरकारने टोल कंपनीला पोलीस संरक्षणात टोलवसुलीची सेवा सुरू केल्याचं चित्र आहे.

तोडफोडीनंतर टोलनाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर, राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी विविध ठिकाणी टोलनाके फोडण्यास सुरूवात केली आहे.

रविवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील विविध टोलनाक्यांवर मनसैनिकांनी टोलनाके फोडून काढले आहेत. राज ठाकरे यांनी, टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा, असा आदेशच नवी मुंबईत दिला होता. त्यानंतर राज्यभर टोलनाक्याची मोडतोड झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 28, 2014, 19:22


comments powered by Disqus