पोलिसांचा पगार एक्सिस बँकेतून लंपास, 29 Axis bank accounts hacked, Rs 13 lakh withdrawn from ATMs

पोलिसांचा पगार एक्सिस बँकेतून लंपास

पोलिसांचा पगार एक्सिस बँकेतून लंपास

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बँकांच्या एटीएम मधून दुसर्या,च व्यक्तीनं पैसे काढून लंपास केल्याच्या घटना कधीतरी घडतात. मात्र ऍक्सिस बँकेच्या खात्यांमधून चक्क पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांचे पगार ऍक्सिस बँकेत जमा होत असतात. मात्र या महिन्यात बँकेच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आल्यानं खळबळ उडाली.

पोलिसांचा पगार लंपास झाल्यानंतर सामान्यांच्या पैशाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

अकाउंट हॅक करून पैसे काढण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांनी बँकेकडे याबाबतचा अहवाल मागितलाय. तसंच याची चौकशी करण्यासाठी एक टीमही तयार केलीय.

एकूण २३ जणांचे अकाऊंट हॅक करण्यात आलेत त्यात १० ते १२ पोलीस कर्मचारी आहेत. परदेशातल्या एटीएममधून या अकाउंटमधून पैसेही काढण्यात आले. एकूण १३ लाख रुपये काढल्याची माहिती बँकेनं दिली. पोलिसांनी बँकेकडून याबाबत सविस्तर माहिती मागवलीय. शिवाय, डीसीपी अधिकार्यारच्या नेतृत्त्वाखाली एक पोलीस पथकही स्थापन करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 14, 2013, 20:03


comments powered by Disqus