दिंडोशी बलात्कार प्रकरणातील ३ आरोपी अल्पवयीन?, 3 accused of Dindoshi Ganrape Juvenile?

दिंडोशी बलात्कार प्रकरणातील ३ आरोपी अल्पवयीन?

दिंडोशी बलात्कार प्रकरणातील ३ आरोपी अल्पवयीन?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिंडोशी सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र हे तिन्ही आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी हा सामूहिक बलात्कार झाला होता. याआधीच तीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आता सहाही आरोपी गजाआड झालेत.

मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये एक नोव्हेंबर रोजी रात्री १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आणखी तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती सापडले नव्हते.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत सहा लोकांचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, गोरेगावच्या संतोष नगर भागात राहणाऱ्या काही युवकांनी शुक्रवारी पीडित अल्पवयीन मुलीला दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या बरोबर येण्यास सांगितलं. ही मुलगी या मुलांना ओळखतं होती त्यामुळे ती त्यांच्याबरोबर बिनदिक्कतपणे गेली. यानंतर या आरोपींनी तिला एका एकांताच्या ठिकाणी नेऊन कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून दिलं. ही मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर सहा पैंकी चार युवकांनी एक-एक करून तिच्यावर बलात्कार केला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 11, 2013, 12:30


comments powered by Disqus