लोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी 3 dies in rush of local trains

लोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी

लोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी
www.24taas.com, मुंबई

लोकलच्या गर्दीने तिघांचा बळी घेतलाय. लोकलमधून पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी-घाटकोपर दरम्यान घडली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

दीपेश कदम आणि अशोक शेलार अशी या तरूणांची नावे आहेत. तर तिस-या व्यक्तीचं नाव अजून कळू शकलेलं नाही. या तिघांवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच या तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचे मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमध्ये आहेत.

या घटनेमुळं पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मेगाब्लॉक आणि तीन प्रवाशांच्या मृत्यूचा काहीही संबंध नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येतोय.

First Published: Monday, December 31, 2012, 21:17


comments powered by Disqus