Last Updated: Friday, April 5, 2013, 08:32
www.24taas.com, मुंबई मुंबईकरांसाठी म्हाडानं पुन्हा एकदा खूशखबर दिलीय. येत्या ३१ मे रोजी म्हाडाची लॉरी काढण्यात येणार आहे.
ही लॉटरी म्हाडाच्या १११० हून अधिक घरांसाठी असेल. यात पवई, तुंगा व्हिलेज, मागाठणे, चारकोपमध्ये इथल्या वसाहतींतील घरांचा समावेश आहे. सर्व उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी असून, ही सर्व प्रक्रिया ऑनलान होणार आहे. उच्च उत्पन्न गटासाठी लॉटरी असणार असून, त्यामुळे घरांची संख्या काही प्रमाणात वाढू शकेल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी दिलीय.
घरे ताब्यात घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे. कोकण मंडळाची सोडत मात्र लांबणीवर पडलेली आहे. कोकण मंडळाच्या घरांची यावर्षी लॉटरी निघणार नाही.
उत्पन्न गटनिहाय घरं अत्यल्प गट - पवई – ३० घरं
अत्यल्प गट - तुंगा, पवई – १२६ घरं
अल्प गट - तुंगा – ६५८ घरं
अल्प गट – चारकोप – ४२ घरं
मध्यम गट – चारकोप – ८४ घरं
First Published: Friday, April 5, 2013, 08:32