Last Updated: Friday, March 29, 2013, 09:47
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेकडून आजपासून तब्बल ४० नव्या सेवांचा शुभारंभ होतोय. यामध्ये चर्चगेट – वसई सकाळी विशेष महिला लोकल आणि मध्य रेल्वेच्या २२ नव्या सेवांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून ४० नव्या लोकल सेवा सुरु होत आहेत. विशेष म्हणजे दोन महिला विशेष लोकल गर्दीच्या वेळी सोडण्यात येणार आहेत. वसईहून चर्चगेटसाठी सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी महिला विशेष लोकल सुटेल तर चर्चगेटहून संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी वसईसाठी महिला विशेष सोडण्यात येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे नालासोपारा लोकल सुरु करण्यात येत असून दिवसभरात तीन नालासोपारा लोकल धावतील. तसंच १५ डब्यांच्या लोकलच्या तब्बल १६ सेवा सुरु केल्या जात आहेत. यामुळे जीवघेण्या गर्दीच्या वेळी थोडा का होईना, दिलासा पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार आहे.
First Published: Friday, March 29, 2013, 09:39