कसारा घाटातील अपघातात 5 ठार 5 killed in accident at kasara ghat

कसारा घाटातील अपघातात 5 ठार

कसारा घाटातील अपघातात 5 ठार

www.24taas.com, झी मीडीया, मुंबई

ठाणे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. कसारा घाटात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दुधाचा टँकर पलटी होऊन हा अपघात घडला. अपघातातील पाच जणही जण एकाच कुटुंबातील आहेत.

ठाणे जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाचा टँकर संगमनेरहून मुंबईला येत असताना कसारा घाटात एका वळणावर हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी आहेत.

जखमींना नाशिकमधील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांमधील सर्वजण गोरेगाव येथील राजीव गांधी नगर येथील रहिवासी आहेत. रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर पलटी झाल्याचे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 17:20


comments powered by Disqus