चेंबूरमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार 8 years old girl raped in Mumbai

चेंबूरमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

चेंबूरमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
www.24taas.com, मुंबई

मुंबईतील चेंबूर उपनगरामध्ये एका अलपवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या मुलीचं वय केवळ ८ वर्षं एवढं आहे. मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रर तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे.

चेंबूरच्या कोंकण नगर भागात राहाणारी ही मुलगी रात्रीच्या सुमारास घराबाहेर गेली होती. यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिला भेटली आणि तिने तुला छान नवे कपडे देतो अशं सांगून मुलीला आपल्याबरोबर अज्ञातस्थळी नेलं. तेथे या इसमने मुलीवर बलात्कार केला.

पीडित मुलगी त्याच अवस्थेत रडत घरी आली. तिची अवस्था पाहून घरच्यांना घडलेल्या गोष्टीची माहिती मिळाली. यावर घरच्यांनी ताबडतोब चेंबूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मुलीची मेडिकल टेस्ट घेण्यात आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं. पोलीस सध्या या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

First Published: Saturday, December 1, 2012, 22:11


comments powered by Disqus