Last Updated: Sunday, May 19, 2013, 12:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई उपनगरात एक धक्कादायक घटना घडली. उपचार घेण्यासाठी आलेल्या एका २६ वर्षीय तरूणीवर डॉक्टरने बलात्कार केला.
हे प्रकरण दाबण्यासाठी डॉक्टरने पोलिसांना लाच दिली. त्यामुळे बलात्कार करणारा डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा आरोप पिडीत तरूणीच्या पतीने केलाय.
पिडीत तरूणी घाटकोपर येथे राहणारी आहे. ही तरूणी खार येथील डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरने उपचार करण्याच्या बहाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर काही स्थानिक लोकांनी खार पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.
पोलिसांना माहिती देऊनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 12:52