Last Updated: Thursday, January 9, 2014, 08:56
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईआम आदमी पक्षाची हवा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे, महाराष्ट्रात नाही, त्यामुळे राज्यात याचा काहीही फरक पडणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे, नवी मुंबईत क्रीडा महोत्सवाच्या उद्धघाटन प्रसंगी आर.आर.पाटील बोलत होते.
तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महायुतीशी हातमिळवणी केल्याने आघाडीला काही फटका बसणार नाही, उलट स्वाभिमानी संघटनेला धर्मनिरपेक्ष मतं मिळणार नाहीत, असा दावा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलाय.
First Published: Thursday, January 9, 2014, 08:56