Last Updated: Saturday, March 8, 2014, 14:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेचा आणखी एक मोहरा गळला आहे. अभिजीत पानसे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. पानसे उद्या मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीर प्रवेश करणार आहे.
पानसे हे ठाण्यातून मनसेचे लोकसभा उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात राजन विचारे - पानसे असा सामना होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या चित्रपट सेनेत पदाधिका-यांच्या नेमणुकीवरून धुसपूस सुरू झाली होती. अध्यक्षपदावरून अभिजीत पानसे यांची गच्छंती करून आदेश बांदेकर यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे पानसे हे नाराज होते. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नव्हते. त्यांची नाराजी दूर न केली गेल्याने त्यांनी सेनेला रामराम केलाय, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आलेय.
मराठी चित्रपटसॄष्टीत नवनवीन दिग्दर्शक दाखल होत असताना त्यात आणखी एका नवीन दिग्दर्शकाची भर अभिजीत पानसे यांच्या रूपाने पाहायला मिळाली आहे. पानसे हे आता आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना आता ते राजकीय भूमिकेत दिसणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 8, 2014, 14:33