Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:30
www.24taas.com, मुंबईराज ठाकरेंना दोन कोटींच्या बक्षीसाचं आव्हान देणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण समाजवादी पार्टीच्या खात्यात दोन कोटींची रक्कमच नसल्याचं स्पष्ट झालंय.
समाजवादी पार्टीचे खजिनदार गणेश कुमार गुप्ता यांनीच ही माहिती दिलीय. म्हणजेच आझमींनी दिलेला चेक बाऊन्स होऊ शकतो. यावर प्रतिक्रिया देताना गुप्तांनी, राज ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघातले बांगलादेशी नागरिक दाखवून देणार नाहीत, परिणामी चेक बाऊन्स होण्याचा प्रश्नच येणार नाही असंही स्पष्ट केलं.
इतकंच नव्हे तर गरज पडल्यास पक्षाच्या खात्याच चार कोटी रूपयेही जमा केले जातील, असंही त्यांनी सांगितलं. मात्र राज ठाकरेंच्या महामोर्चानंतर धास्तावलेल्या अबू आझमींचा स्टंट या निमीत्तानं उघड झाला आहे.
First Published: Thursday, August 23, 2012, 11:13