Last Updated: Tuesday, August 14, 2012, 14:12
www.24taas.com, मुंबई२६/११ हल्ल्यातील आरोपी अबू जिंदालनं आपल्या आईशी बोलण्याची परवानगी कोर्टाकडे मागितलीय. जिंदालच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवत त्याला त्याच्या आईशी बोलण्याची परवानगी कोर्टानं दिलीय.
अबू पहिल्यांदाच कोर्टात बोलला. त्यानं कोर्टाकडं आईशी बोलण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार कोर्टानं त्याला परवानगी दिलीय. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अबू जिंदाल आपला मुलगा नाही असं वक्तव्य त्याच्या आईनं केलं होतं. २६/११च्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अबू हमजा हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. औरंगाबाद जवळच्या वेरूळ इथे मे २००६ मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता,तेव्हा पासून हमजा फरार होता. बीड शहरातील कागजी वेस भागात राहणाऱ्या अबूला चार बहिणी आई-वडील असा परिवार आहे.
दरम्यान, अबू जिंदालला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
First Published: Tuesday, August 14, 2012, 14:12