Last Updated: Tuesday, September 18, 2012, 14:40
www.24taas.com, मुंबईनवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या उभारणीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्य़ा एसीबीमार्फत चौकशीला गृह खात्यानं मंजूरी दिली आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या उभारणीची कंत्राटं देताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील लोकांना आणि सुनांच्या कंपन्यांना कंत्राटे मिळतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
या शिवाय महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा खर्च 52 कोटींवरुन 150 कोटींवर गेल्यानं या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीची परवानगी मागितली होती.
या परवानगीच्या पत्रावर गृहमंत्री आर आर पाटील यांनी सही केल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं येत्या काळात छगन भुजबळ यांनी एसीबीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, September 18, 2012, 14:40