भरधाव गाडीने ६ महिलांना उडविले, दोघींचा मृत्यू, Accident in Andheri 2 women death

भरधाव गाडीने ६ महिलांना उडविले, दोघींचा मृत्यू

भरधाव गाडीने ६ महिलांना उडविले, दोघींचा मृत्यू
www.24taas.com, मुंबई

मुंबईत भरधाव इंडिकानं सहा महिलांना धडक दिली आहे. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जणी जखमी झाल्या आहेत. अंधेरी पूर्वेतल्या सिप्झ परिसरात ही घटना घडली आहे.

काही महिला सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या होत्या तर काही महिला कामावर जाण्याच्या निमित्ताने बसची वाट पाहत थांबल्या होत्या. तेव्हा एका भरधाव इंडिका गाडीने या सहाही महिलांना उडवले.

तर त्यात दोन जणींचा जागीच मृत्यू झाला या महिलांवर काळाने घाला घातला. काही महिला या बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्याही या अपघातात जखमी झाल्या आहेत. महिलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

First Published: Tuesday, January 22, 2013, 13:52


comments powered by Disqus