Last Updated: Tuesday, December 11, 2012, 16:55
www.24taas.com, मुंबई आज पुन्हा एकदा मुंबईत एका तरुणीवर अॅसिड हल्ला झालाय. कांदिवलीतल्या समतानगर भागात ही घटना घडलीय. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झालंय.
जखमी तरुणीला उपचारासाठी डीएनए हॉस्पीटल दाखल करण्यात आलंय तर हल्ला करणाऱ्या सतिन शिगवण या २६ वर्षीय आरोपीला गजाआड करण्यात आलंय. दरम्यान, या घटनेत आणखी एक महिला जखमी झालीये. श्रद्धा लांडगे आणि मिलन अशी अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणींची नावं आहेत.
First Published: Tuesday, December 11, 2012, 16:43