Last Updated: Thursday, April 18, 2013, 18:55
www.24taas.com, मुंबईआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी समितीचा अंतिम अहवाल पूर्ण झाला असून, आज संध्याकाळी सहा वाजता हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यापुढे सादर केला जाणार आहे. आणि त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येईल.
न्यायमूर्ती जे ए पाटील आणि पी सुब्रमण्यम या द्विसदस्यीय समितीने आदर्श घोटाळ्याबाबत चौकशी केली असून यात मोठा घोळ असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलय. सोसायटीच्या 103 सदस्यांपैकी 50 जण बोगस असल्याचं समोर आलय. 691 पानांचा हा अहवाल असून, यात सरकारी अधिकारी, संरक्षण दलाचे अधिकारी आणि राजकीय व्यक्तींवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी आदर्श चौकशी समितीनं 100 पानांचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला होता. मुख्यमंत्र्यांकडे अहवाल गेल्यावर यासंदर्भात पुढील कारवाई स्पष्ट होईल.
First Published: Thursday, April 18, 2013, 18:49