Last Updated: Sunday, April 20, 2014, 17:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर यांचं शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
अधिक शिरोडकर हे शिवसेनेचे राज्यसभेतील माजी खासदार होते. त्यापेक्षा त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वकील म्हणून अनेकवेळा काम केले होते. तसेच ते एक छायाचित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते.
परळ येथे राहत असलेले शिरोडकर यांना शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जसलोक रुग्णालयात नेले. पण, त्यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
शिरोडकर यांनी आपल्या वकीलीच्या कार्यकाळात अनेक कनिष्ठ वकीलांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिवसेनेचे कायदेविषयक सल्लागार म्हणूनही काम केले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 20, 2014, 16:51