आदित्य पांचोलीची मारहाण सीसीटीव्हीत कैद, Aditya Pancholi booked for punching, assaulting neighbour

आदित्य पांचोलीची मारहाण सीसीटीव्हीत कैद

आदित्य पांचोलीची मारहाण सीसीटीव्हीत कैद
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात शेजाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आदित्यने मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे आदित्य पांचोली अडचणीत सापडला आहे.

पांचोली वर्सोवा-यारी रोडवरील मॅगनम सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहतो. याच इमारतीत तळ मजल्यावर राहणार्यार भार्गव पटेल यांच्याकडे जानेवारी महिन्यात फर्निचरचे काम सुरू होते. त्याचा त्रास झाल्याने १५ जानेवारी रोजी पांचोली पटेल यांच्या घरी धडकला. पटेल यांना त्याने खेचून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. शेजार्याटने पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण दिले आहे. त्यात पांचोली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना स्पष्ट दिसतो आहे, असे वर्सोवा पोलिसांनी सांगितले.

पटेल यांच्या पत्नीलाही त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. २४ फेब्रुवारी रोजी रात्री सोसायटीत गाडी पार्क करणार्याच पटेल यांना पांचोलीने दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर काल पांचोलीविरोधात पटेल यांच्या घरी जबरदस्ती घुसणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप पांचोलीला अटक झालेली नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 28, 2013, 11:32


comments powered by Disqus