18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत, After almost 18 hours of the start of Konkan Railway

तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झालीय. नागोठणे इथं झालेल्या दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानंतर ही वाहतूक विस्कळीत झाली होतीय.

सकाळी 4 वाजून सात मिनिटांनी रेल्वेमार्ग मोकळा करण्यात आला आणि त्यानंतर पाच वाजून दोन मिनिटांनी पहिली ट्रेन इथून रवाना झालीय.. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे घटनास्थळाचा दौरा करणार आहेत. तसंच रोहा इथं हॉस्पिटलमध्ये जाऊन ते जखमींची विचारपूस करतील.

दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर, 10103 CSTM-मडगाव 'मांडवी' एक्स्प्रेस तर दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर अंशत: रोहा येथे सावंतवाडी-मडगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 07:53


comments powered by Disqus