Last Updated: Monday, September 30, 2013, 08:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदिल्लीतल्या सभेत टीकेचे बाण सोडल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज मुंबईत येतायत.मोदींचा हा एक दिवसाचा मुंबई दौरा असणार आहे.
मुंबई भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचलाय.
मुंबईत ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे मोठमोठे होर्डींग्जही लावण्यात आले आहेत.
मोदी आज मुंबईत कोणत्याही रॅली किंवा सभेसाठी नाही तर एका उद्घाटन सोहळ्यासाठी येणार आहेत. आज ४ वाजण्याच्या सुमारास मोदी मुंबईत येतील. मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशनच्या डायमंड हालचं उद्घाटन मोदींच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथं होणार आहे. त्यानंतर मोदी हॉटेल ट्रायडंट इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात मोदी सहभागी होतील.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारपदी घोषणा झाल्यानंतर मोदींची ही पहिलाच मुंबई दौरा आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, September 30, 2013, 08:36