Last Updated: Saturday, November 3, 2012, 18:15
www.24taas.com, मुंबईशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्या लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
जुलैमध्ये त्यांच्यावर पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. या तपासणीच्या निमित्तानं पुढले तीन दिवस त्यांचा मुक्काम लीलावती रुग्णालयात असण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर पहिली अँजिओप्लास्टी झाली, त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. यानंतर आता यावेळीही राज उपस्थित राहणार की नाही याबाबतही चर्चा सुरू आहे.
First Published: Saturday, November 3, 2012, 18:08