Last Updated: Tuesday, January 14, 2014, 14:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईएअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या आपल्या नातलगांचं अचूक ठिकाण यापुढे कळणार आहे. म्हणजेच एअर इंडियाची फ्लाईट नेमक्या क्षणी कुठे आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळणार आहे.
एअर लाईनच्या वेबसाईटवर हे सॉफ्टवेअर उपलब्ध असेल. फक्त फ्लाईट नंबर त्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवला असता तुम्हाला फ्लाईट्सचं करंट लोकेशन आणि गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती लगेच मिळेल. एअर इंडियाच्या विमानांच्या वक्तशीरपणाबद्दल न बोललेच बरं. त्यामुळे आपल्या नातलगांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेलेल्यांना फ्लाईट डिले असल्याचा अनुभव बरेचदा येतो.
मात्र आता एखाद्या फ्लाईटने उड्डाण केल्यावर ती कुठे आहे. तसंच गंतव्य स्थानी ते फ्लाईट किती वाजता पोहोचेल याची माहिती मिळणार नाही. तशी यंत्रणा कंपनी कार्यान्वित करत आहे. याआधी इंडिगो एअरलाईन्स आणि भारतीय रेल्वेने अशाप्रकारची यंत्रणा उपलब्ध केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 13:39