Last Updated: Wednesday, July 3, 2013, 23:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवायू दलाच्या सर्वात महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या अशा पश्चिम वायूदल विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल सुनिल सोमण ह्यांनी सुत्रे घेतली आहेत. पश्चिम वायूदल विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली इथे सोमण ह्यांनी आज पदभार स्वीकारला.
महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले सुनिल सोमण हे वायू दलात १९७६ साली दाखल झाले. तब्बल तीन हजार ४०० तासांच्या लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा सोमण ह्यांना अनुभव आहे.
पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून आता सोमण ह्यांच्याकडे जम्मू आणि काश्मिर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब , हरियाणा, आणि राजधानी नवी दिल्ली ह्या विस्तृत आणि अत्यंत महत्त्वांच्या भागांची जबाबदारी
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 3, 2013, 23:40