Last Updated: Friday, December 6, 2013, 17:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसी प्लेन...एक असं विमान जे जमीनीवर आणि पाण्यावरही उतरु किंवा उड्डाण घेऊ शकतं. आता याच विमानाने मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागात तुम्हाला प्रवास करता येणार आहे आणि तोही वेळ वाचवून.
मुंबईच्या जुहू, गिरगांव चौपाटी ते नाशिक, लवासा, लोनावळा, अॅम्बी व्हॅली तसच गणपतीपुळे, तारकल्ली, हरिहरेश्वर या ठिकाणी या विमानातून प्रवास करता येणार आहे. मुंबई नाशिक हा प्रवास अवघ्या ३५ मिनिटांत पूर्ण करता येईल तर या प्रवासासाठी सहा हजार तिकिट असेल.
सध्या भारतात मालदिवमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ही सेवा सुरु आहे. स्वस्त, जलद आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आता या सीप्लेनची सर्वच उत्सुकतेनं वाट पाहातायत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, December 6, 2013, 17:42