अखेर दादांनी खरं काय ते सांगून टाकलंच! ajit pawar about congress ncp relation

अखेर दादांनी खरं काय ते सांगून टाकलंच!

अखेर दादांनी खरं काय ते सांगून टाकलंच!
www.24taas.com, मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद हे फक्त निवडणुकांपुरतेच असतात, ते फारसे मनावर घेऊ नका. निवडणुका संपल्या की आरोप-प्रत्यारोपही संपतात, असं उघडउघड गुपित अजित पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलंय.

स्वबळाची भाषा करणारे अजितदादा आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतच लढणार असल्याचंही सांगायला विसरले नाहीत. हातात हात घालून सत्ता भोगणाऱ्या पक्षांनी संधी साधून अशी भूमिका घेतली तरी यात जनतेसाठी नवीन काही नाही. मात्र राजकीय पक्ष वारंवार जनतेला मुर्ख बनवण्याचे असे धंदे करत असतात हे अजित पवारांच्या वक्तव्यातून पुन्हा एका स्पष्ट झालंय.

First Published: Friday, November 9, 2012, 14:41


comments powered by Disqus