Last Updated: Friday, February 21, 2014, 13:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईऊर्जा खात्यातील २२ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप ऊर्जामंत्री अजित पवारांनी फेटाळून लावले आहेत.
आपच्या नेत्या अंजली दमानियांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरोप केल्याचं अजित पवारांचं म्हणणंय. आपने पुरावे न देता आरोप केले आहेत.
दरवर्षी १५०० कोटींची कोळसा खरेदी होते. तर १२ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा करणार असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय.
कोळसा खरेदीचं कॅगकडून ऑडिट झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. आपच्या आरोपांना मुंबईत येऊन उत्तर देणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय.
राज्याच्या ऊर्जा खात्यात अजित पवारांनी २२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केला.
घोटाळा झाला नसता तर राज्यात ५० टक्के विजेचे दर कमी झाले असते असा दावाही त्यांनी केला. तर आपचे नेते मयांक गांधी आणि योगेंद्र यादव यांची मुंबई बिल्डर्ससोबत गुप्त बैठक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला.
महाराष्ट्राला विनाकारण महागडी वीज खरेदी करावी लागतेय का? आपच्या आरोपांना उत्तरं देण्याऐवजी राष्ट्रवादी त्यांच्यावर वेगळे आरोप का करतंय? आणि या आरोप-प्रत्यारोपांमागे मतांचं राजकारण आहे का? यासारख्या प्रश्नांचा वेध आमच्या रोखठोक या कार्यक्रमात घेण्यात आला.
यावेळी अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलीच जुंपली.
व्हिडीओत पाहा नेमकं अंजली दमानिया नवाब मलिक यांच्यावर का संतापल्या
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 21, 2014, 13:20