अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस, Ajit Pawar, Munde`s flats notice

अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस

अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावलीय. शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी १६ कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय.या सोसायटींमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहे.

शुभदा सोसायटीचे ११ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सुखदा सोसायटीची ४ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे. अजित पवार आणि गोपीनाथ मुंडे यांशिवाय पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पंतगराव कदम आणि अनिल देशमुख यांसह अनेक अनेक बड्या नेत्यांचे फ्लॅट्स या इमारतींमध्ये आहेत. या दोन्ही सोसायटींच्या इमारतींचा मालमत्ता कर भऱण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आलीय. 

या दोन्ही इमारतींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवल्यानं मुंबई पालिकेनं या नोटीसा पाठवल्या आहेत. या इमारतीतल्या सर्व फ्लॅट धारकांना सप्टेंबर २०१३ पर्यंत मालमत्ता कर भरण्याची मुदत होती. त्याला आता चार महिने उलटलेत. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 19:05


comments powered by Disqus