...जेव्हा अजित पवार घेतात रेखाची विकेट!, ajit pawar took rakhas wicket

...जेव्हा अजित पवार घेतात रेखाची विकेट!

<B> ...जेव्हा अजित पवार घेतात रेखाची विकेट! </b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एरवी राजकारणाच्या मैदानात सतत धावत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी मराठी तारकांच्या कार्यक्रमात चांगलेच रंगले. आपण अमिताभचे फॅन असल्याचं सांगत अजितदादांनी रेखाचीच विकेट काढण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत मराठी तारका या शोचा १०० वा प्रयोग रंगला तो आशा भोसले, रेखा आणि उपमुख्यमंत्री अजितपवारांच्या खास उपस्थितीने... मराठमोळ्या १४ तारकांनी दिलखेचक परफॉर्मन्स सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. मात्र, कार्यक्रमात आणखीन रंगत आली ती रेखा आणि अजितदादांच्या शाब्दिक जुगलबंदीने... आशाताईंना गाण्याचा आग्रह करताना रेखाने अजितदादांनाही ठेका धरण्याची गळ घातली.

याच कार्यक्रमात जेव्हा अजितदादांना तुमची आवडती हिरोईन कोण? असं विचारण्यात आलं तेव्हा अजितदादांनी असं काही उत्तर दिलं की ज्यामुळे रेखाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सिलसिला चमकला... `माझा आवडता अभिनेता आहे अमिताभ आणि आवडती अभिनेत्री रेखा` असं अजित दादांचं उत्तर रेखाची विकेट काढणारंच होतं... पण, रेखानंही हा प्रसंग हसतमुखानंच स्वीकारला.

एकूणच मराठी तारकांच्या या शोमध्ये आशाताईंचा जादूई आवाज, रेखाचा लाईव्ह परफॉर्मन्स आणि मराठी तारकांना मिळालेली कौतुकाची थाप आणि अजितदादांनी घेतलेली रेखाची विकेट हाच चर्चेचा विषय ठरला.


व्हिडिओ पाहा -




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 2, 2014, 10:20


comments powered by Disqus