मराठा आरक्षणासाठी दिग्गज मंत्री एकत्र! All ministers together for Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी दिग्गज मंत्री एकत्र!

मराठा आरक्षणासाठी दिग्गज मंत्री एकत्र!
www.24taas.com, मुंबई

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळणारच, असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिग्गज नेतेमंडळी आता एकत्र आली आहेत.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी मराठा संघटनांनी आझाद मैदानात मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये 22 मराठा संघटनांनी सहभाग नोंदवला. या मोर्चाचे नेतृत्व युवराज छत्रपती संभाजीराजे करत आहेत.


या मोर्चाच्या ठिकाणी नारायण राणे, हर्षवर्धन पाटील आणि आर.आर. पाटील यांनीही उपस्थिती लावलीय. मोर्चेकरांच्या मागण्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिलं आहे.

First Published: Thursday, April 4, 2013, 18:30


comments powered by Disqus