Last Updated: Tuesday, July 2, 2013, 15:50
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईकुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.
अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांने कुलाबा येथे आपल्या कारची तोडफोड केल्याचे नदीम मेमन याने म्हटले होते. मात्र, मेमन यांचा आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावलाय. पार्थ याचा या घटनेशी काहीही संबंध नाही. मेमन यांची तशी कोणतीही तक्रार पोलिसात दिलेली नाही. ज्यावेळी घटना घडली तेव्हा पार्थ घरी होता, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, आरोप करणारे नदीम मेमन यांनीही पार्थ नसल्याचे म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहे. यामध्ये पार्थ नाही. आम्ही नजरचुकीने पार्थचे नाव घेतले, हे आता आमच्या लक्षाल आलेय, असे मेमन यांनी सांगितले.
याप्रकरणात ओम रामखियानी, करण राठी, नेवील पटेल हे तिघे दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मेमन यांनी केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 2, 2013, 15:48