Last Updated: Sunday, August 19, 2012, 21:52
www.24taas.com, मुंबईअबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिध्द फॅशन डिझायनरनी इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मुंबईमध्ये एक शानदार पार्टी आयोजित केली...
या पार्टीमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, श्रीदेवी-बोनी कपूर, हेमामालिनी, कऱण जोहार, दीपिका पदुकोण, यांसारख्या बिग स्टार्सने उपस्थिती लावली. अबू जानी आणि संदीप खोसला यांनी बॉलिवूडमधील अनेक नामवंत सेलिब्रिटींसाठी कॉश्च्यून डिझाईन केले आहेत.
त्यामुळे या द्वयींच्या या सेलिब्रेशनला बॉलिवूड सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या..तसंच या पार्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्टी मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील राहत्या घरी झाली...
First Published: Sunday, August 19, 2012, 21:52