अमेरिकन महिलेवर लोकलमध्ये हल्ला, American woman attacked, robbed inside Mumbai local train

अमेरिकन महिलेवर लोकलमध्ये हल्ला

अमेरिकन महिलेवर लोकलमध्ये हल्ला
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका अमेरिकन महिलेवर ब्लेडनं हल्ला करण्यात आलाय. अज्ञात इसमानं हा हल्ला केलाय.

चर्चगेट ते मरीन लाईन्स या दोन रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडलीय. मरीन लाइन्स स्टेशनवर हा इसम ट्रेनमध्ये चढला आणि त्यानं मिशेल मार्क या महिलेवर हल्ला केल्याचं समजतंय.

मिशेल ही एका सामाजिक संस्थेसाठी काम करते. घटनेनंतर जखमी मिशेलवर नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. चोरीच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जातेय. या प्रकरणी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेत आहेत.

मात्र या घटनेमुळं पुन्हा एकदा राज्यात आणि विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिला असुरक्षित असल्याचं दिसून आलंय. राज्यात महिला सुरक्षित असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे दावे या घटनेमुळं फोल ठरल्याचंच दिसतंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 19, 2013, 08:15


comments powered by Disqus