Last Updated: Friday, May 23, 2014, 08:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईतुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणी भाजपा नेता अमित शहा यांच्यासह 18 आरोपींना आज कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं.
नोव्हेंबर २००५ रोजी गांधीनगर इथं सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी हीची एन्काऊंटर मध्ये हत्या करण्यात आली होती. त्या प्रसंगाचा तुलसीराम प्रजापती नावाचा व्यक्ती प्रत्यक्षदर्शी होता त्याचीही डिसेंबर २००६ रोजी हत्या करण्यात आली होती.
सप्टेंबर २०१२ मध्ये सीबीआयने या प्रकरणी आरोप पत्र दाखल केल होत.. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा संपूर्ण खटला मुंबईत वर्ग करण्यात आला आहे त्यानुसार ९ मे २०१४ ला मुंबईतील स्पेशल सीबीआय कोर्टाने अमित शहांसह १८ आरोपींना समन्स बजावला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 23, 2014, 08:23