Last Updated: Friday, June 6, 2014, 14:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहानायक अमिताभ बच्चन हे महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे आता ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणार आहेत.
अमिताभ बच्चन हे महाराष्ट्रातील फळबागाचं प्रमोशन करणात आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केलेली जाहिरात तसेच फोटोज लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील आंबा, द्राक्षं, संत्रा, डाळिंब सारख्या फळ पिकांचं बिग बी प्रमोशन करणार आहेत.
अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी गुजरातचं ब्रॅण्ड अॅम्बेसडर म्हणून काम पाहिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी गुजरातच्या पर्यटन विभागाचं ब्रॅण्डिंग केलं होतं.
गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यासाठी आता बिग ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून काम करणार आहेत, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये याविषयी जरी नाराजी असली, तरी फलोत्पादनाचं खातं राष्ट्रवादीकडे आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 6, 2014, 14:06