Last Updated: Tuesday, September 18, 2012, 23:58
www.24taas.com, मुंबई अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलेल्या पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांचा मुलगा नवराज क्वात्रा याची मागच्या शुक्रवारी त्यांच्याच घरात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांच्या हातात काही धागेदोरे सापडलेत.
नवराज यांच्या घरातून पोलिसांनी अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सची अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ हस्तगत केलेत. नवराज याच्या हत्येमागे एखाद्या अभिनेत्रीचा हात असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय. नवराज पॉर्न इंडस्ट्रीमध्येही सक्रीय असल्याची शंकाही व्यक्त होतेय. गेल्या शुक्रवारी नवराजची त्यांच्या बोरिवलीच्या राहत्या घरी हत्या झाली होती.
क्वात्रा याच्या घरातून मिळालेल्या व्हिडिओमध्ये १९ मॉडल्स आणि अभिनेत्रींची अश्लील हावभाव आढळलेत. पण, त्यांची नावं उघड करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिलाय. पण, यामध्ये काही अभिनेत्रींचाही समावेश असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलाय. यातील एक अभिनेत्री अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतेय तर दुसरी अभिनेत्री आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाचं सेलिब्रेशन करतेय.
First Published: Tuesday, September 18, 2012, 20:04