Last Updated: Sunday, October 27, 2013, 08:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअंधेरीतील फिल्मालय स्टुडियोमध्ये तोडफोडीची घटना घडलीय. फिल्मायर स्टुडियोमध्ये राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चं शूटिंग सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली.
शूटिंग दरम्यान एका जमावानं जबरदस्ती स्टुडिओत शिरण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध करताच त्यांनी सिक्यूरिटी केबीनची तोडफोड करायला सुरूवात केली. या जमावांनं इथल्या महिला रिसेप्शनिस्टचा विनयभंगही केला. तसंच पैशांची मागणी केली.
दरम्यान राज कुंद्रा यांच्या बाऊंसर्सनी या जमावाला आडवण्याचा प्रयत्न केला या वेळी कुंद्रा यांच्या बाऊंसर्सनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. घटना घडताच कुंद्रा यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तोडफोड करणाऱ्या जमावातील काहींना ताब्यात घेतलंय. या जमावातील काहीजण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 27, 2013, 08:19