Last Updated: Tuesday, January 1, 2013, 08:12
www.24taas.com, मुंबई आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्ष म्हटलं की नवे संकल्प हे आलेच... नव्या वर्षाची सुरुवात चांगल्या काहीतरी कामाने करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आज अंगारकी चतुर्थी आणि नवे वर्ष असाही एक दूर्मिळ भक्तीमय योग आलाय. तब्बल ९५ वर्षांनंतर असा योग आल्यानंव गणेशभक्तांमध्ये आणखीनच आनंदाचं वातारवण आहेत.
मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात रात्रीपासूनच भाविकांनी रांगा लावल्यात. पहाटेपासूनही अनेकजण मंदिरात सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी अनेक गणेशभक्त आज उत्सुक आहेत. सिद्धीविनायक मंदिरात आज पहाटेपासून आरती आणि भजनांचा गजर ऐकायला मिळतोय. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही यानिमित्ताने करण्यात आलंय.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारिका आल्याने हे वर्ष गणेश वर्ष आहे तसंच यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडणार आहे, त्यामुळे हे वर्ष दुष्काळाविना असणार आहे, असे खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी म्हटलंय.
First Published: Tuesday, January 1, 2013, 07:52