बाप्पांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा !, Angarki Chaturthi darshan in Prabhadevi mandir

बाप्पांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा !

बाप्पांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा !
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलीय. दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्ट व्यवस्थापानानं पुरुषांसाठी 40 हजार तर स्त्रियांसाठी 20 स्केअर फुटांचा मोठा मंडप उभा केला आहे.

मंडपामध्ये सुमारे 5 हजार पुरुष आणि 3 हजार स्त्रिया रांगेत उभे राहू शकणारेत. मंदिर व्यवस्थापनानं श्रींच्या दुरुन दर्शनाचीही व्यवस्था केलीय. काकड आरती आणि महापुजेनंतर रात्री दीड वाजल्यापासून सामान्य भक्तांना रांगेतून श्रींचे दर्शन घेता येणार आहे. वरिष्ठ नागरिक, अपंग, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांचे पालकांसाठी वेगळ्या रांगा ठेवल्या जाणारेत. एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मंदिर परिसरात राहणार आहे.

अंगारकीसाठी पश्चिम रेल्वे विशेष दोन गाड्या सोडल्या आहे. पहाटे चर्चगेट विरार ही स्लो ट्रेन चर्चगेटहून दीड वाजता सोडण्यात आली तर विरारहून चर्चगेट ही स्लो लोकल पहाटे तीन वाजताच विरारहून सोडण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 28, 2013, 07:56


comments powered by Disqus