पेट्रोल पंप बंद राहणार, Announcement of petrol pumps closed

पेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार

पेट्रोल पंप बेमुदत बंद राहणार
www.24taas.com,मुंबई

मुंबई आणि राज्यासह देशभरातील १८ राज्यातल्या वाहनचालकांचे उद्या पासून बेमुदत हाल होणार आहेत. केंद्र सरकार कमिशनमध्ये वाढ करत नसल्यानं उद्यापासून पेट्रोल पंप चालकांनी एक शिफ्टमध्ये काम करण्याचं अनोख आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.

सायंकाळी पाच नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहे. त्यामुळं सकाळी आठ ते सात या वेळेतच पंपावर इंधन मिळणार आहे. त्यामुळं ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे. प्रतिलिटर पेट्रोलवर १ रुपया ४९ पैसे तर डिझेलवर प्रतिलिटर ९१ पैसे कमिशन मिळतं. त्यात वाढ करून मिळावी या मागणीसाठी देशभरातील पेट्रोलपंप चालकांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलंय.

आंदोलनामुळे केंद्र सरकार कमिशन वाढविण्याची मागणी मान्य करतील असा विश्वास पंप मालकांना आहे. मात्र सरकार जर या आंदोलनाच्या दबावाला बळी पडलं तर कमिशनचे पैसे सर्वसामान्यांच्या खिशातूनच वसूल केले जाणार असून पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

केंद्र सरकारने २०१० मध्ये अपूर्वचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल केंद्राला सादर केलंय. त्यात पेट्रोल पंपबाबत विवध सोयी सुविधा आणि आर्थिक प्रश्नाबाबत शिफारशी केल्या होत्या त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केलीय.

First Published: Sunday, October 14, 2012, 21:33


comments powered by Disqus