पोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट! any blunder with police affects on career

पोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट!

पोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट!
www.24taas.com, मुंबई

मुंबईमध्ये युनिफॉर्ममधल्या पोलिसांवर हात उचलल्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी काढलेल्या एका आदेशानुसार पोलिसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.

यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं. तुम्ही नोकरी करत असल्यास, तुमच्या विरुद्धचा अहवाल कंपनीला पाठवला जाईल. यामुळे तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते.

सीएसटी इथं ऑगस्टमध्ये झालेल्या हुल्लडबाजीत दंगलखोरांनी पोलिसांनाही टार्गेट केलं होतं. ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांची छेड काढण्यापर्यंत मजल गेली होती. या पार्श्वभूमीवर सिंग यांनी दिलेले हे आदेश महत्त्वाचे मानले जात आहेत.

First Published: Saturday, October 20, 2012, 09:01


comments powered by Disqus