Last Updated: Thursday, September 27, 2012, 09:23
www.24taas.com, मुंबई मुंबईतल्या मनोरा या आमदार निवासातील आत्महत्या प्रकरणी डी.एड. कालेजचा प्राचार्य रवींद्र चिखले याला कफ परेड पोलिसांनी अटक केलीय. रवींद्र चिखलेला आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
आमदार निवासात आत्महत्या करणा-या रुपाली अंधारे (२७) या तरूणीचा तो मित्र होता. मात्र रवींद्र चिखले याने रुपालीबरोबर लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे निराश झालेल्या तरूणीनं आत्महत्या केली. ज्यादिवशी ही घटना घडली, त्या दिवशी ते दोघेही बरोबरच होते. तसंच मागील सात महिन्यांपासून ते एकत्र राहत होते. सोलापूरमधील एका महाविद्यालयात ते नोकरी करत होते.
रुपाली ही बाश्री तालुक्यातील तरुणीने नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र याबाबत अधिक चौकशी केली असता पोलिसांना रामचंद्र चिखले (३१) यांचे नाव समोर आले. चिखले यांना पोलिसांनी चौकशीसाठी बाश्री तालुक्यातून आणले. त्याची अधिक चौकशी केली असता चिखले याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबध ठेवल्याचे चिखले याने पोलिसांना सांगितले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
First Published: Thursday, September 27, 2012, 09:13