परदेशी तरूणीवर बलात्कार करणारा अटकेत, Arrested foreigner girl Rape case

परदेशी तरूणीवर बलात्कार करणारा अटकेत

परदेशी तरूणीवर बलात्कार करणारा अटकेत
www.24taas.com, मुंबई

स्पॅनिश तरुणीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी रे रोड परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. चोरीमध्ये सराईत असलेल्या या चोरट्यानेच बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. वांद्रे पोलिसांनी रे रोड येथून मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह (३०) याला अटक केली असून त्याने चोरीदरम्यान दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बादशहाने २००८ मध्येदेखील जूहू येथे चीनच्या युवतीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. २७ वर्षीय स्पॅनिश तरुणीच्या फ्लॅटमध्ये बादशहा दुसर्‍या फ्लॅटच्या खिडकीतून घुसला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या बादशहाला ही तरुणी एकटीच सापडली. याच संधीचा फायदा घेत त्याने चाकूचा धाक दाखवून दोन वेळा बलात्कार केला. बादशहा घरात घुसल्यानंतर ती तरुणी दार उघडून घराबाहेर पडली. तिने शेजार्‍यांची दारे ठोठावली, पण कुणीच दार उघडले नाही.

त्यामुळे बादशहाने तिला पुन्हा घरात खेचून आणले. मध्यरात्रीमुळे वॉचमनही गाढ झोपेत होते. त्यामुळे कुणीच मदतीला धावले नाही. अभिनेता दिनू मोरिया याच्या घरातील चोरीप्रकरणीदेखील त्याला अटक झाली होती.

First Published: Wednesday, November 7, 2012, 16:01


comments powered by Disqus