Last Updated: Friday, August 31, 2012, 12:54
www.24taas.com, मुंबईअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या मोक्का न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे.
ज्यावेळी शिक्षा सुनावली जात होती त्यावेळी गवळी कोर्टात होता. यावेळी गवळीचा चेहरा निर्विकार होता. त्याला कोर्टाकडून सुनावली जाणारी शिक्षा अपेक्षितच होती असं जाणवत होतं.
मुंबईत अंडरवर्ल्ड डॉनला शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. गवळीच्या कुटुंबीयांकडून मोक्का कोर्टाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्याची तयारी करण्यात आली आहे.
First Published: Friday, August 31, 2012, 12:16