पाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय करणार?- आशाताई, Asha bhosale on sachin

पाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय?- आशाताई

पाकविरूद्ध सचिन खेळल्यास त्याचं काय?- आशाताई
www.24taas.com, मुंबई

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. आशाताई पाकिस्तानी कलाकरांबरोबर काम करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. राज ठाकरे आणि आशाताई यांच्या वादात आता त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ओढलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी दोन देशांदरम्यान क्रिकेट मालिका सुरु करण्याच्या हालचाली सुरु असून, त्याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे माझे लक्ष लागले आहे, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि आशाताई यांच्यात `सूरक्षेत्रा`वरुन रंगलेले शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा पेटणार आहे. पण मग आता राज ठाकरे नक्की काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Thursday, September 6, 2012, 14:28


comments powered by Disqus