आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या, Asha bhosle daughter varsha bhosale suicide

आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या

आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या
www.24taas.com, मुंबई

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. नैराश्येनं ग्रासलेल्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. वर्षा भोसले यांनी यापूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. स्वत:वर गोळी झाडून वर्षा भोसले यांनी आपलं जीवन संपवलंय.

आशा भोसले यांच्या तीन मुलींपैकी वर्षा ही दोन नंबरची मुलगी.. ५६ वर्षांच्या वर्षा भोसले या गेल्या काही काळापासून नैराश्याचा गर्तेत सापडल्या होत्या. त्यांचा विवाह क्रीडा पत्रकार हेमंत केंकरे यांच्याशी झाला होता पण काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर वर्षा या एकट्या राहत होत्या. त्या स्वत: गायिका आणि पत्रकार होत्या.

आशाताईंबरोबर वर्षा भोसले यांनी काही गाणीही गायली होती. 'तालासुरांची गट्टी जमली, नाचगाण्यात मैफल रमली' हे गाणं आशा-वर्षा यांनी एकत्र गायलं होतं. त्याचबरोबर ‘चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ हे वर्षा भोसले यांनी गायलेलं गाणंही अनेकांच्या आजतागायत लक्षात आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' मध्ये स्तभंलेखिका म्हणून त्यांनी काही काळ काम केलं होतं, तर 'रेडीफ मेल' या न्यूज वेबसाईट पोर्टलमध्येही त्यांनी काम केलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार वर्षा यांच्याकडे लायसन्ससहित रिवॉल्व्हर होती. त्यांच्या आत्महत्येमुळे साऱ्याच नातेवाईकांना जबर धक्का बसलाय. आशा भोसले या सध्या ‘मिफ्ता’ अवॉर्डसाठी सिंगापूरमध्ये आहेत.




First Published: Monday, October 8, 2012, 13:31


comments powered by Disqus