Last Updated: Friday, March 14, 2014, 13:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई `आम आदमी पार्टी`च्या दिल्लीतील कार्यकर्त्या पुष्पा रावत यांच्यावर मुंबईत जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.
शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलीय. अंधेरीत पक्षाच्या प्रचारासाठी पथनाट्यात सामील होण्यासाठी पुष्पा रावत सामील होणार होत्या.
सकाळी साडे आठ वाजता त्या मंदिरात जात असताना त्यांच्यावर अज्ञात बाईकस्वारानं धारदार शस्त्रानं हल्ला केला. `भारत माता की जय` असे शब्द उच्चारत हा हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. हल्लेखोराने पुष्पा यांच्या मानेवर धारदार ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुष्पा यांनी ते वार चुकविले. त्यानंतर पुष्पा रावत यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्यावर ब्लेडचे वार आहेत. मात्र, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी म्हटलंय.
यासंबंधी रावत यांनी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 14, 2014, 13:13