काळोखात मनपाच्या गाड्यांवर हल्ला, attack on bmc vehicles in worli

काळोखात मनपा कर्मचाऱ्यांवर-गाड्यांवर हल्ला

काळोखात मनपा कर्मचाऱ्यांवर-गाड्यांवर हल्ला
www.24taas.com, मुंबई

वरळीतील अॅनी बेझन्ट रोडवर महापालिकेच्या यानगृहात मनपाच्या गाड्या आणि सुरक्षा रक्षकांच्या चौकीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आलीय तसंच मनपा कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आलीय.

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडलीय. ही तोडफोड करणाऱ्यांबद्दल माहिती नसल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. अचानक जमाव आला आणि त्यांनी तोडफोड केल्याची माहिती इथल्या कर्मचाऱ्यांनी दिलीय.

यानगृहात तोडफोड केल्यानंतर या टोळक्यानं वरळीतल्याच लव्हग्रो पम्पिंग स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला. तिथंही या टोळक्यानं सुरक्षा चौकीची तोडफोड केली आणि मनपा कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली.

First Published: Tuesday, December 11, 2012, 09:23


comments powered by Disqus