भररस्त्यात तरुणीच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार, attack on Girl face in mumbai

भररस्त्यात तरुणीच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार

भररस्त्यात तरुणीच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार
www.24taas.com, मुंबई

मुंबईत दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढतच चालला आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याच्यात भरच पडत आहे. परळ येथील शिरोडकर हायस्कूलजवळ आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने भररस्त्यात विद्यार्थिनीच्या गालावर ब्लेडने वार केल्याची थरारक घटना घडली.

वार केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रशांत हुले (२०) या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा अन्य साथीदार फरारी असून भोईवाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित विद्यार्थिनी शिरोडकर हायस्कूलमध्ये बेकरी आणि कॉन्फेशनरीचा कोर्स करते.

सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी आली असता प्रशांत हुले याने तिला आयटीसी हॉटेलजवळ हेरले आणि सोबत आणलेल्या ब्लेडने तिच्या चेहर्‍यावर सपासप वार केले. वार केल्यानंतर प्रशांतने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्याला पकडून चोप दिला आणि भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

First Published: Saturday, November 3, 2012, 21:08


comments powered by Disqus