Last Updated: Tuesday, August 14, 2012, 12:02
www.24taas.com, मुंबईसीएसटीवर झालेल्या दंगलीत खऱ्या अर्थाने बळी पडले ते पोलीस आणि पत्रकार. पोलीस, महिला पोलीस शिपाई यांना मारहाण करण्यात आली. शस्त्रे होती पण आदेश नव्हते, त्यामुळे पोलिसांकडे मार खाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
फोर्ट परिसरात मुस्लिमांनी घातलेला हिंसाचार पोलीस आयुक्तांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच आटोक्यात आला असे म्हटले जात असले.
तरी प्रत्यक्षात गोळीबाराचे आदेश उशिरा मिळाल्याने पोलीस हतबल झाले. हातोडे, लोखंडी सळ्या, खिळे ठोकलेल्या पट्ट्या, कोयते यांचा सामना काठीने कसा करणार? आम्ही तिथे होतो पण आमच्यासाठी कुणीच नव्हते, अशी सल हल्ल्यात रक्त सांडलेल्या पोलिसांनी बोलून दाखवली. संतप्त झालेल्या मुस्लिमांनी प्रथम वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन जाळली. हत्यारे असूनही पोलीस काहीच करीत नाहीत हे पाहून जमाव बेकाबू झाला. आणखी काही खासगी गाड्या पेटविल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले
पोलिसांकडे केवळ काठ्या असल्याचे पाहून जमावाचे धैर्य आणखी वाढले. दगड, कोयते, लोखंडी सळ्या घेऊन पाठलाग करून पोलिसांना मारले. रिव्हॉल्वर, पिस्तूल असूनही त्याचा वापर करता आला नाही. खासगी सुरक्षारक्षक आणि आमच्यामध्ये फरक तो काय? असा सवाल करीत यापुढे अशा प्रसंगांना तोंड देताना धाडस होणार नाही, असे एक जखमी पोलीस म्हणाला.
First Published: Tuesday, August 14, 2012, 12:02